डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथे उत्साहात गणेश आगमन

भुसावळ :
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथे दिनांक 27 रोजी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात, लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने जयघोष करत नृत्य सादर केले व परिसर मंगलमय वातावरणाने भारावून गेला.
या वर्षी शाळेत विशेष उपक्रम म्हणून शिक्षकांनी गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेऊन पर्यावरणपूरक शाळू मातीची मूर्ती स्वतः तयार केली. याच मूर्तीची मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांच्या हस्ते विधीवत प्रतिष्ठापना व पूजन करण्यात आले.
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गणपती मंदिराची आकर्षक रोषणाई तसेच शिक्षकांनी स्वतः बनवलेले पर्यावरणपूरक सजावट हे आगमन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
गणेशोत्सवामुळे शाळेच्या परिसरात भक्तिभाव, उत्साह आणि पर्यावरणपूरकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.





