गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात गणपतीचे उत्साहात आगमन

जळगाव – गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात गणपती बाप्पाचे गाजत वाजत उत्साहात आगमन करण्यात आले विद्यार्थी पारंपारिक मराठमोळ्या पोशाखात गणपतीच्या मिरवणुकीत सामील झाले होते यावेळी विद्यार्थी मराठी गाण्यावर गणपतीच्या गाण्यांवर नाचत गणपतीच्या आगमन महाविद्यालयात झाले. विद्यार्थ्यांनी छान सुरेख असा पुणे येथील शनिवार वाडा देखावा सादर केला व त्यात लालबागच्या राजाची मूर्ती बसवण्यात आली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके व डॉ. नीलिमा वारके यांनी भक्ती भावाने पूजा अर्चना करून प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी डॉक्टर प्रशांत वारके यांनी गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनासाठी हे कार्य सुरू केले गणपती उत्सव हा दिवाळी सारखाच दुसरा मोठा उत्सव आहे तुम्ही यावर्षी काही नवीन संकल्प करा आपण नेहमी गणेशाचे नाव घेऊन नवीन संकल्पाला सुरुवात करतो. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन हे प्रा.प्रज्ञा बाविस्कर यांनी केले.