ताज्या बातम्या
डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयात गणपतीचे उत्साहात आगमन.

जळगाव – डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयात गणपती बाप्पाचे गाजत वाजत उत्साहात आगमन करण्यात आले विद्यार्थिनींनी पारंपारिक मराठमोळ्या पोशाखात गणपतीच्या मिरवणुकीत शामिल झाल्या होत्या यावेळी विद्यार्थिनी मराठी गाण्यांवर गणपतीच्या गाण्यांवर नाचत गणपतीच्या आगमन महाविद्यालयात झाले. विद्यार्थिनींनी छान सुरेख असा पुणे येथील शनिवार वाडा देखावा सादर केला व त्यात लालबागचा राजाची मूर्ती बसवण्यात आली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल डॉ. नीलिमा वारके व डॉ. प्रशांत वारके यांनी भक्ती भावाने पूजा अर्चना करून प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी प्रिन्सिपल डॉ. नीलिमा वारके यांनी गणेश उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन हे प्रा. मानसी अहिरे यांनी केले.