महर्षी चरक जयंतीचे आयोजन

जळगाव – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे महर्षी चरक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रम संहिता, सिद्धांत आणि संस्कृत विभागाने आयोजित केला होता.प्राचीन भारतातील महान वैद्य महर्षी चरक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केला होता. या प्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले यांचेसह प्राध्यापक,डॉक्टर आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करीत महर्षि चरक यांना अभिवादन केले. यावेळी बोलतांना डॉ. बोरोले यांनी महर्षी चरक यांच्या कार्यावर प्रकाश टाकत आयुर्वेद शास्त्रातील त्यांच्या मौल्यवान योगदानाचे महत्त्व चरक संहितेतील गूढ ज्ञानाचा सखोल अभ्यास करून ते आधुनिक वैद्यकशास्त्रात कसे उपयुक्त ठरू शकते, याविषयी मार्गदर्शन केले.डॉ. उल्हास पाटील यांनीही ऑनलाईन उपस्थीती देत महर्षि चरक यांच्या कार्याचा गौरव करीत विद्यार्थ्यांना भारतीय आयुर्वेद परंपरेचा गौरव वाढवण्याचे आणि तिचे जतन करण्याचे आवाहन केले

