डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार

जळगाव — डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातील गुणवंताचा सत्कार नुकताच पार पडला. यात महाविद्यालयातून प्रथम आलेले विद्यार्थी व विद्यार्थींनींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गणेशोत्सवात गेल्या ८ वर्षापासून हा पुरस्कार प्रदान केला जात असून यंदा ९ वे वर्ष आहे. दरवर्षी महाविद्यालयातून प्रथम व व्दितीय क्रमांक प्राप्त करणा—या स्कॉलर विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जातो. डॉ.एन एस आर्विकर व स्व. डॉ. कडूस्कर यांच्या संकल्पनेतून ही परंपरा अखंड सुरू आहे. चषक, प्रमाणपत्र व रोख ५००० रू असे हया पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख, मेडीसिन विभागप्रमुख डॉ.सी.डी.सारंग, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड आणि अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांची उपस्थिती होते.
डॉ. कडूस्कर यांचा ओम अवार्ड तृतीय वर्ष एमबीबीएस भाग २ यश तिवारी मुलांमध्ये आणि मुलींमध्ये मोईयादी उम्मे आईमन यांना
तर डॉ.एन एस आर्विकर यांचा एक्सलन्स अवार्ड तृतीय वर्ष एमबीबीएस भाग १ मुलांमध्ये राहूल जैन तर मुलींमध्ये बोदियाजी आदिबा यांना,
स्व.वासुदेव पाटील अवार्ड,व्दीतीय क्रमांक विजेते शार्दुल कावनकर,रिया साळवी
आणि व्दितीय वर्ष एमबीबीएसची सायली कापसे यांना डॉ.नागेंद्र अवार्ड मायक्रोबॉयोलॅजी टॉपर साठी प्रदान करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांनी टॉपर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना अशा पुरस्कारातून स्कॉलर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगून अभिनंदन केले.