ताज्या बातम्या
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे गणेश चतुर्थी मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली.

दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी विद्यार्थ्यांच्या सवाद्य मिरवणुकीतून गणपती बाप्पांचे आगमन करण्यात आले. डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी सपत्नीक धार्मिक विधीनुसार पूजा-अर्चना करून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
या वेळी कॉलेजचे teaching स्टाफ, non-teaching स्टाफ, हॉस्पिटल कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात परिसर गणेशमय झाला होता.
गणेशोत्सवाने कॉलेज परिसरात भक्तिभाव, उत्साह आणि सामूहिक एकतेचे सुंदर दर्शन घडवले



