ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकीत स्टुडन्ट कौन्सिल इंस्टॉलेशन (विद्यार्थी परिषद गठीत )


जळगाव — येथील गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्टुडन्ट कौन्सिल इंस्टॉलेशन (विद्यार्थी परिषद गठीत) समारंभाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. नितीन भोळे (विभाग प्रमुख, बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटिज), प्रा. तुषार कोळी (अधिष्ठाता), प्रा दीपक झांबरे (डिप्लोमा समन्वयक) व सर्व विभाग प्रमुख तसेच शिक्षक वर्ग आणि सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व गोदावरी आजीच्या प्रतिमेस हार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून झाली.त्यानंतर स्टुडन्ट कौन्सिल स्थापनेच्या समारंभात सर्व शाखांच्या कौन्सिलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदानुसार बॅचेसचे वाटप करून त्यांना गौरवान्वीत केले.त्यानंतर शाखा निहाय विद्यार्थी प्रेसिडेंट यांनी त्यांच्या विभागाच्या स्टुडन्ट कौन्सिलची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली व आगामी काळात त्यांच्या कौन्सिलच्या माध्यमातून करण्यात येणार्या कार्यक्रमाचा आढावा त्यांच्या भाषणातून दिला. त्यामध्ये ज्ञानदीप पाटील(सेसा), मयूर कोळी (मेसा), प्रणव थोरात (टेसा), प्रेरणा पाटील (आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स), सारंग पाटील (ईईएसए) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.त्यानंतर प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आधीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म नव्हते. पण आज या माध्यमातून वर्किंग टुगेदर गरजेचे आहे. अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मचा फायदा नक्कीच होतो.विद्यार्थ्यांनी वेळेवरच आपले ध्येय ठरवणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे आपले स्वप्न सांगायला कधीही घाबरू नका, स्टुडन्ट कौन्सिल समारंभा नंतर खर्या अर्थाने तुमच्यावर आता नवीन जबाबदार्या येतील व प्रत्येक जबाबदारी तुम्हाला समर्थपणे पार पाडायची आहे असे नमूद केले.उत्कृष्ट प्रेझेंटेशन केल्याबद्दल उएड- प्रेसिडेंट ज्ञानदीप पाटील व डिंकी शदानी यांना अवार्ड देण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडन्ट कौन्सिलचे फॅकल्टी कॉर्डिनेटर , प्रा. आर. व्ही. पाटील (टेसा) व डॉ. निलेश चौधरी(सेसा),प्रा. प्रवीण पाटील (मेसा), प्रा. रोहित नेमाडे(ईईएसए), प्रा. रेश्मा अत्तरदे(एईएसए) यांनी डॉ. नितीन भोळे (विभाग प्रमुख, बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटिज) यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळजा महाजन , हिमांशु चौधरी, जान्हवी चव्हाण , प्रियांका चौधरी या विद्यार्थ्यांनी केले.सदर उपक्रमाबाबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button