आयपीएचए महाराष्ट्र आंतर वैद्यकिय महाविद्यालय सार्वजनिक आरोग्य क्विझ स्पर्धा – २०२५, राज्यस्तरीय फेरी आज

आयपीएचए आणि डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचा सयुक्त उपक्रम
जळगाव – आयपीएचए महाराष्ट्र आंतर वैद्यकिय महाविद्यालय सार्वजनिक आरोग्य क्विझ स्पर्धा २०२५ ची राज्यस्तरीय फेरी दि. ११ जुलै रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव खु. येथे दु. २ वा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभरातून वैद्यकिय आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतात, यंदा पद्म भूषण डॉ. जल मेहता रोलिंग ट्रॉफी साठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळणार आहे.आयपीएचए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. प्रसाद वैंगणकर, आयपीएचए उपाध्यक्ष व डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय जळगावचे अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, आयपीएचए महाराष्ट्राचे सचिव डॉ. दीपक किस्मतराव, राज्य समन्वयक, आयपीएचए डॉ. योगिता बावस्कर, आयपीएचए क्विझ २०२५ आयोजन कम्युनिटी मेडीसिन विभाग डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. दिलीप ढेकळे, आयोजक यांची प्रमुख उपस्थीती राहील. स्पर्धेत सामाजिक आरोग्य, महामारी व्यवस्थापन, पोषण, जल स्वच्छता, प्राथमिक आरोग्य सेवा, रुग्णसंख्या आराखड्यांवरील ज्ञानाचे प्रश्न राहतील, ही स्पर्धा सहा प्रमुख विभागामध्ये घेऊन अंतिम फेरी साठी पर्धकांची निवड केली आहे.सदर अंतिम फेरी ही महाराष्ट्र राज्य स्तराची असून ती डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे दिनाक ११ जुलै २०२५ रोजी दु २ वा. घेण्यात येत आहे.अंतिम फेरीत विजेत्यांना पद्म भूषण डॉ. जल मेहता रोलिंग ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यावरील जागरूकता वाढवणे, विद्यार्थी समुदायाला व्यावहारिक प्रश्नांमुळे प्रेरणा देणे, सार्वजनिक आरोग्य धोरणे आणि उपाययोजनांवर विद्यार्थ्यांना सजग करणे हा या स्पर्धेचा मुख्य उददेश असून यशस्वी आयोजनासाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व आयएपीएचए महाराष्ट्राचे सर्व सदस्य परीश्रम घेत आहे