डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

जळगाव – गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन कें द्र येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
या प्रसंगी, अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. डॉ.बोरोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ज्ञानाचा खजिना म्हणून ग्रंथालयांचे महत्त्व विषद केले आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि वैयक्तिक वाढीसाठी ग्रंथालय संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहित केले.ग्रंथपाल रवींद्र पिंगळे यांनी भारतीय ग्रंथपाल विज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन आणि भारतातील ग्रंथालय प्रणालींच्या विकासात त्यांचे अमूल्य योगदान याबद्दल माहिती विषद केली. कार्यक्रमाचा समारोप एका संवादात्मक सत्राने झाला ज्यात विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षणात ग्रंथालये कशी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत यावर त्यांचे विचार व्यक्त केले

