ताज्या बातम्या
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस साजरा

जळगाव – गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.
यावेळी त्यांनी आपल्या भाषणात १९५७ साली एस. आर. रंगनाथन यांना पद्मश्री देण्यात आला, एस. आर. रंगनाथन यांनी लायब्ररी सायन्स यावर साठ पुस्तके देखील लिहिली यामध्ये त्यांचे योगदान खूप मोठे आहे. यावेळी वारके सरांनी आपण पुढील वर्षात दहा तरी पुस्तके वाचली पाहिजे असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश सरोदे यांनी देखील एस. आर. रंगनाथन यांचा संपूर्ण प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमास महाविद्यालयातील सगळे सहकारी उपस्थित होते.