ताज्या बातम्या
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा येथे पर्यावरणपूरक गणेश स्थापना

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा येथे आज सकाळी मोठ्या उत्साहात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे या वर्षी शाळेत बसविण्यात आलेली गणेश मूर्ती ही पर्यावरणपूरक असून ती शाळेच्या कला शिक्षक उमेश बढे यांनी स्वतःच्या हस्ते तयार केली. या कार्यात त्यांना कांचन महाजन व खीलेश राणा यांनी विशेष सहाय्य केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या वेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून गणपती बाप्पा मोरया! अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

