कथित वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी जिल्हा स्तरावर एक समितीतडॉ. अनिल पाटील यांची राज्य वैद्यकीय परिषदेच्या प्रतिनीधीपदी निवड

जळगाव – येथील जळगाव आयएमएचे माजी कार्याध्यक्ष तथा प्रख्यात युरोलॉजीस्ट डॉ. अनिल पाटील यांची कथित वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी जिल्हा स्तरावर एक समितीत प्रतिनीधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
वैद्यकीय व्यवसायिक किंवा रुग्णालयाकडून रुग्णावर उपचार करताना निष्काळजीपणा करणे किंवा वेळेवर उपचार न करणे अशा प्रकारच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून सामान्य रुग्णालय जळगाव येथे येत असतात अशा तक्रारींची चौकशी करण्यासाठी एक समिती शासनाच्या निर्देशानुसार सामान्य रुग्णालय जळगाव येथे कार्यरत असते. जिल्हा शल्य चिकित्सक हे या समितीचे अध्यक्ष असतात व वरील समितीमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा एक नियुक्त पदाधिकारी असतोवरील समितीवर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नियुक्त पदाधिकारी पदी डॉ. अनिल पाटील यांची नुकतीच निवड झालेली आहे. ही निवड महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुगवानी यांनी केलेली आहे जळगाव आयएमएचे माजी सचिव तथा प्रख्यात युरोलॉजीस्ट डॉ. अनिल पाटील यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या प्रतिनीधीपदी निवडीबद्दल जळगाव आयएमए संघटना, विविध वैद्यकीय संघटना आणि गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील,जळगाव आयएमएचे माजी सचिव व माझी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉक्टर विलास भोळे यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राज्य वैद्यकीय परिषदेवर प्रतिनीधी म्हणून निवड झालेले अनिल पाटील यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या अडीअडचणी, समस्या सोडविण्याबाबत अनेक निर्णायक भूमिका पार पाडल्या आहे.