ताज्या बातम्या

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये ‘जागतिक मेंदू आरोग्य दिन खेलोे दिमाग से’ उपक्रम


जळगाव — येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात नुकताच ‘जागतिक मेंदू आरोग्य दिनानिमीत्त जनजागृती करण्यात आली.यावेही खेलो दिमाग से उपक्रम राबवण्यात आला.
‘खेळो दिमाग से’ या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मेंदूविकासास चालना देणार्‍या रंजक आणि सर्जनशील खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.या कार्यक्रमात एम एस्सी नर्सिंग प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, गटसंवाद आणि समन्वय वाढवणारे उपक्रम हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाला प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे परीक्षण आणि मूल्यमापन डॉ. प्रियदर्शनी मून आणि प्रा. मालती यांनी केले.या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून विभागप्रमुख सर्जीकल नर्सिंग प्रा. मनोरमा कश्यप यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना प्रा. प्रशिक चौहान आणि प्रा. सुमैया शेख यांची लाभली.हा उपक्रम केवळ मेंदूच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यापुरता मर्यादित नव्हता, तर विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नेतृत्वगुण व संघभावना यांना चालना देणारा ठरला. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकवृंद यांच्या एकत्रित सहभागातून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button