नागरिकांनी देशभक्तीचा जजबा अंगी बाळगावा – डॉ. उल्हास पाटील.

गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांत स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन – ८० जणांचे रक्तदान
जळगाव – भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन गोदावरी फाउंडेशनच्या सर्व संस्थांमध्ये उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे संस्थाध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.




या वेळी डी.एम. कार्डिओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रकाश सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय बाविस्कर, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मिश्रा, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. उल्हास पाटील म्हणाले, “देश सर्वच क्षेत्रांत वेगाने प्रगती करत आहे. संधी सर्वांसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक नागरिकाने देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा जजबा आपल्या अंतःकरणात जागवावा.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. देशभक्तीपर गीते, सांस्कृतिक सादरीकरणे आणि प्रेरणादायी भाषणांनी वातावरण भारावून गेले. विशेष उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले ज्यात ८० दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला




