गोदावरी अभियांत्रिकीत इंडक्शन (प्रवर्तन)उत्साहात

जळगाव — गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात येथे पहिल्या वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन (प्रवर्तन) कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने तसेच स्व. गोदावरी आजींच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून झाली व त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जसिंथ धया, (उपप्राचार्या, गोदावरी नर्सिंग कॉलेज) तसेच प्रा. अश्विनी वैद्य, (प्रमुख मानसिक आरोग्य नर्सिंग विभाग, गोदावरी नर्सिंग कॉलेज) उपस्थित होते. डॉ. नितीन भोळे, (विभागप्रमुख – बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज) यांनी विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष विभागातील विषय, प्रयोगशाळा व सुविधा यांची माहिती दिली व विद्यार्थ्यांना भक्कम पायाभूत ज्ञान घडविण्याचे मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, शैक्षणिक उत्कृष्टता, सर्वांगीण विकास, कोडींगचे महत्त्व व विविध अभियांत्रिकी शाखांचे महत्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे प्रा. जसिंथ धया यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना कष्ट, समर्पण, नवनिर्मितीची वृत्ती आणि कधीही हार न मानण्याची भूमिका यावर भर दिला. त्यांनी अल्बर्ट आइनस्टाईनची प्रेरणादायी कथा सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.तसेच प्रा. अश्विनी वैद्य यांनी विद्यार्थ्यांना ध्येय व उद्दिष्ट निश्चित करण्याचे महत्त्व तसेच एक चांगला अभियंता होण्यासाठी आवश्यक गुणधर्म याबाबत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी देखील आपले अनुभव व्यक्त केले. दुपारच्या सत्रामध्ये प्रशिक्षण व रोजगार विभागप्रमुख डॉ. विजयकुमार वानखेडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्लेसमेंटविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेचे महत्त्व, शिस्त आणि कौशल्यविकास यावर भर देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.या प्रवर्तन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष संगणक विभागाची विद्यार्थिनी कु. नयन लालवाणी व प्रा. खुशाली बेलदार यांनी केले. या कार्यक्रमाचे कार्यक्रम समन्वयक प्रा.पंकज पाटील व प्रा. खुशाली बेलदार यांनी केले. तसेच सर्वप्रथमवर्षीय शिक्षकवृंदांनी त्यांना मदत केले. अशा प्रकारे इंडक्शन (प्रवर्तन) कार्यक्रमाचा पहिला दिवस यशस्वीरीत्या संपन्न झाला व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सकारात्मक सुरुवात मिळाली.सदर उपक्रमाबाबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील(डीएम कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.





