परिचारिका होण्याचे स्वप्न आता पूर्ण करा – वयोमर्यादा नाही!

१२ वी उत्तीर्णांसाठी ANM अभ्यासक्रमात प्रवेश प्रक्रिया सुरू
जळगाव, दि. २३ जुलै (प्रतिनिधी):
परिचारिका होण्याचे स्वप्न काहीना कौटुंबिक, आर्थिक किंवा सामाजिक कारणांमुळे अधुरे राहते. मात्र आता १२ वी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी हे स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाइफ (ANM) हा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम ज्या मुलींना आरोग्य सेवा क्षेत्रात करिअर घडवायचे आहे, त्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
गोदावरी नर्सिंग कॉलेज, जळगाव खुर्द येथे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमासाठी वयाची कोणतीही अट नाही. त्यामुळे शिक्षणात खंड पडलेले किंवा आता पुन्हा नव्याने करिअर सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांनाही ही संधी खुली आहे.
ANM म्हणजे काय?
ANM म्हणजे Auxiliary Nursing Midwifery. या अभ्यासक्रमात विद्यार्थी प्रसूतिसेवाशास्त्र, लसीकरण, माता व बाल आरोग्य, प्राथमिक उपचार, आरोग्य शिक्षण आदींचे मूलभूत प्रशिक्षण घेतात. ग्रामीण व शहरी भागातील आरोग्यसेवांमध्ये ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये:
सेवाभावाची संधी: समाजात गरजू लोकांची सेवा करण्याची संधी
त्वरित करिअरची सुरुवात: दोन वर्षांच्या कालावधीत शिक्षण पूर्ण करून लगेच नोकरीच्या संधी
सरकारी व खाजगी क्षेत्रात मागणी: प्राथमिक आरोग्य केंद्रे, सरकारी रुग्णालये, खाजगी संस्थांमध्ये भरपूर मागणी
महिला सक्षमीकरण: ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वावलंबी बनण्याचा प्रभावी मार्ग
उच्च शिक्षणाच्या संधी: ANM नंतर GNM वा B.Sc. Nursing अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचे द्वार खुले
स्थिर नोकरी आणि सुरक्षा: आरोग्य सेवा क्षेत्रात दीर्घकालीन रोजगाराची खात्री
उमेदवारांसाठी आवाहन:
ज्या महिलांना समाजसेवा करण्याची आवड आहे, ज्यांना आरोग्य क्षेत्रात करिअर करायचे आहे आणि लवकर नोकरी मिळवून कुटुंबासाठी हातभार लावण्याची ईच्छा आहे, त्यांनी या अभ्यासक्रमाचा अवश्य विचार करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रविण कोल्हे
प्रशासकीय अधिकारी
गोदावरी नर्सिंग कॉलेज, जळगाव